दुष्टाव्याचे मूळ
दोन देशांमधील सशस्त्र संघर्षाकडे आपण भीतीने, घृणेने पाहतो. पण आर्थिक संघर्ष युद्धांपेक्षा कमी भीतिदायक किंवा घृणास्पद नसतात. युद्ध हे शल्यक्रियेसारखे असते, तर आर्थिक संघर्ष प्रदीर्घ छळासारखे असतात. त्यांचे दुष्परिणाम युद्धांबद्दलच्या साहित्यातील वर्णनांइतकेच भयंकर असतात. आपण आर्थिक संघर्षांना महत्त्व देत नाही, कारण आपल्याला त्यांच्या घातक परिणामांची सवय असते. युद्धविरोधी चळवळी योग्यच आहेत. मी त्यांना सुयश चिंततो. …